![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjLjdirLcbsL6BjMyMewY5ctQ40_QZKD9iScYZRmRn_1ktH3162ZnDc3EZmQn9xqF8CxRIiALCM04XhLU46KzKGwox_9ZmtkuEk6okYDqR13kQuwoW3zK4U-z81SpjUh7hMLGK5B3X0vqg/s320/20200130_173514.png)
हे CAA म्हणजे काय रं भाऊ ? नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी ( NRC ) या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे सुरुवातीस समजून घेण गरजेचं आहे. एक कायदा नागरिकत्व देण्यासंदर्भात आहे तर दुसरा नागरिकत्व हिरावून घेण्यासंदर्भात आहे. दोन्ही मध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे या दोन्ही गोष्टींना सध्याच्या केंद्र सरकारचा पाठिंबा आहे तर केंद्रामध्ये सत्ते मध्ये नसणाऱ्या पक्षांचा विरोध आहे. एवढे साम्य सोडले तर दोन्हा कायद्यांमध्ये काहीही साम्य नाही. एकदा ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे समजल की पुढील गोष्टी कळण्यासाठी मार्ग मोगळा होईल . या लेखामध्ये आपण फक्त CAA म्हणजे काय? ते कशा संदर्भात आहे? ते आपल्या जीवनाशी संबधित आहे काय ? त्याला विरोध का होतोय ? इत्यादी प्रश्नांची उकल करणार आहोत . CAA म्हणजे काय ? नागरिकत्व सुधारणा कायदा ( CAA ) हा सध्याच्या एन.डी.ए/भाजपा ( मोदी ) सरकारने तयार केलेला, संसदेमध्ये स्पष्ट बहुमताने पारित केलेला कायदा आहे. 2016 मध्येच मोदी सरकारने हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु राज्यसभेत बहुमत न मिळाल्याने या विधेयकाचा अस्त झाला . पण सध्या मोदी...